Ad will apear here
Next
विकार मनाचे
‘शारीरिक आजारांकडे आपण जितक्या वस्तुनिष्ठपणे पाहतो तितक्याच वस्तुनिष्ठपणे मानसिक विकारांकडे पाहायला हवे,’ असे डॉ. हिमानी चाफेकर म्हणतात. मानसिक विकारांकडे शास्त्रीय नजरेतून वस्तुनिष्ठपणे पाहून डॉ. चाफेकर यांनी हे लेखन केले आहे.  

या पुस्तकात एकूण १३ विभाग असून, प्रारंभी त्यांनी मनोविकारावर आयुर्वेद आणि होमिओपॅथीतील उपचारांची माहिती दिली आहे. त्यानंतर विविध मानसिक विकारांची विस्ताराने माहिती दिली आहे. मन:स्थितीविषयक विकृती, चिंताव्याकूळ विकृती, छिन्नमनस्कता, इटिंग डिसऑर्डर, डिलिरियम, डिमेंशिया आणि अॅम्नीझिया या विकारांची स्वतंत्र प्रकरणांमधून माहिती समजते. ही माहिती देताना डॉ. चाफेकर आजाराच्या लक्षणांबरोबरच मानसिक, शारीरिक कारणांचा वेध घेत उपचारांबाबतही सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे. हे सांगताना अनेक उदाहरणे समोर ठेवली आहेत. एकूणच विकार लपविण्यापेक्षा त्याला सामोरे जाऊन उपचार करण्याचे बळ या लेखनामधून मिळते.  

प्रकाशक : उषा अनिल प्रकाशन
पाने : २७२  
किंमत : ३०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZOPBR
Similar Posts
कुंडलिनी शक्ती योग, कुंडलिनी व श्वासोच्छ्वास हा त्रिकोण म्हणजे शरीराची प्राणशक्ती आहे. मन एकाग्र केल्यानंतर कालांतराने समाधी अवस्था येते. श्वासोच्छ्वासाची गती मंदावते व त्यातून पुढे कुंडलिनी जागृती सुरू होते. हे त्वरेने शक्य नसले, तरी रोजची बैठक, ध्यान साधना यातून आपल्या शरीरातील कुंडलिनी जागृत करू शकतो.
कुंडलिनी शक्ती ‘कुंडलिनी शक्ती ही प्राणत्रिकोणाची तिसरी बाजू आहे. शक्तिताप योगाद्वारे कुंडलिनीवर थेट आघात होतो आणि ती जगात येते आणि ती जागृत होते. अध्यात्मिक गुरू शक्तिसंक्रमणाद्वारा शिष्याची कुंडलिनी जागृत करतो,’ असे डॉ. अविनाश चाफेकर यांनी या पुस्तकात म्हटले आहे.
टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन आर्थिक बाजारात पैसे कमविण्यासाठी चांगली संधी असते; मात्र अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजाराचे अपुरे ज्ञान असल्याने पैसे गमविण्यासाठी वेळ त्यांच्यावर येते. स्वतःची मेहनतीची कमाई अशा प्रकारे घालविण्याऐवजी योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे गुंतविण्यासाठी रवी पटेल यांनी ‘टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन’मधून

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language